सुगंध आणि मानसिक स्वास्थ्य: अरोमाथेरपी आणि ज्योतिषशास्त्राचा अनोखा संगम | Aroma and Mental Health: The Unique Blend of Aromatherapy and Astrology
.jpg)
Aadya Exim – Where Astrology Meets Aromatherapy & Global Trade! We craft premium incense sticks tailored to zodiac signs and dosha balancing, blending ancient Vedic wisdom with modern well-being. As a merchant exporter, sourcing expert, and business consultant, we connect businesses to global markets with ease. Our mission is to bring prosperity, positivity, and success through the power of fragrance and seamless trade solutions.
Introduction Of Incense |
जेंव्हा आपल्याला अगरबत्ती दिसते तेंव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आठवत ते एखादे मंदिर किंवा घरातील देवघर. हे अगदीच साहजिक आहे. कारण गेल्या अनेक पिढ्या आपण अगरबत्ती हि मंदिरात जाळली जाणारी एक सुगंधी वस्तू म्हणूनच वापरतो. पण खरं तर अगरबत्तीचा इतिहास खूप जुना आहे. ज्याप्रमाणे ह्याला एक अध्यात्मिक बाजू आहे त्याचप्रमाणे ह्याला शास्त्रीय खास करून आयुर्वेदिक बाजूही आहे.
धुपाचा उल्लेख असलेला माहितीचा सर्वात जुना स्रोत म्हणजे वेद. विशेषतः अथर्ववेद आणि ऋग्वेद. ह्या वेदांनीच धूप बनवण्याची एक पद्धत सेट केली. ह्यामध्ये तो कधी वापरावा, कसा वापरावा, का वापरावा याबद्दलचे सविस्तर वर्णन केलेले आहे. त्याचबरोबर कुराण आणि बायबल सारख्या महान धर्म ग्रंथात पण धुपाचा उल्लेख येतो. बाळ येशूला मिळालेल्या दोन भेटवस्तूंपैकी एक भेटवस्तू म्हणजे धूप. (सोने आणि गंध ).
पूर्वीच्या काळी धूप हा हवेतील दुर्गंध घालवून एक आनंदी, प्रसन्न आणि शांत वातावरण निर्मिती साठी वापरला जायचा. धुपामध्ये असणाऱ्या काही विशिष्ठ घटकांमुळे आजूबाजूचे वातावरण सकारात्मक तर बनायचेच शिवाय डास, माश्या यांसारखे उपद्रवी कीटकही दूर राहत असत. त्यामुळे ऋषीमुनी, साधूसंत त्यांच्या उपासनेच्या वेळी, पूजेच्या वेळी एकाग्रतेसाठी आवर्जून धूप जाळत असत. म्हणूनच हिंदू धर्मात धूप जाळणे हा दैनंदिन पूजाविधीचा एक महत्वाचा भाग बनला. आपल्या इष्टदेवतेपुढे धूप जाळणे हि त्यांच्याप्रती आपला असलेला आदर दर्शवण्याची एक पद्धत म्हणून त्याकडे बघितले जाऊ लागले आणि त्यातून निर्माण झालेली राख हि इतरांसाठी केलेल्या स्वतःच्या बलिदानाचे प्रतिक मानले जाऊ लागले.
तसेच इजिप्शियन लोकांच्या ममीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या बामच्या घटकांमध्येहि काही विशिष्ठ प्रकारचे धूप आढळले असल्याची नोंद आहे. असे म्हणतात कि देवतांशी संवाद साधण्यासाठी ते मंदिरांमध्ये जाळले जायचे. जपानमध्ये, उदबत्तीचा उपयोग Kôdô मध्ये गंध कला विकसित करण्यासाठी केला जातो आणि ते हंगामानुसार धूप “ऐकतात". तिबेटी भिक्षुंसाठी धूप हा ध्यानाच्या अभ्यासाचा अविभाज्य भाग आहे.
असा हा रोजच्या वापरातील धूप दिसायला जरी साधा वाटला तरी ती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे परिणाम करतो. पुढच्या काही लेखांमधून आपण धुपाचा इतिहास, त्याची निर्मिती आणि त्याचे मानवी जीवनावर होणारे विविध परिणाम याबाबत माहिती घेणार आहोत.
Thank
you
Sonal
Pandit
Aadya
Exim
Email
:- aadyaexim.udyami@gmail.com
Website
:- www.aadyaex.com
Mob.
7798136101 / 8010176526
Hari om
ReplyDeleteKhup chhan mahiti
thank you
DeleteVery nice and useful information
ReplyDeleteThank you
DeleteVery Informative.....Keep blogging
ReplyDeleteThank you
Deleteअतिशय सुंदर माहिती
ReplyDeleteअगरबत्ती विषयी अजून जाणून घ्यायला आवडेल आणि ते सुद्धा सोप्प्या भाषेत
खूप छान।
Thank You
Delete